शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

0
16

नागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ चा दिवस आठवला की गोवारी बांधवांच्या अंगाला शहारे येतात. दरवर्षी टी-पॉईंटवरील शहीद स्थळावर हे बांधव आपल्या उद्विग्न भावनांना व्यक्त करतात. कुणी अश्रू ढाळत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो. तर कुणी शिव्याशापाचा भडीमार करीत सरकारला कोसतो. या घटनेत ११४ गोवारी बांधवांना केवळ एका ‘स्वल्पविराम’साठी जीव गमवावा लागला होता. परंतु २१ वर्षानंतरही गोंडगोवारीत स्वल्पविराम टाकण्यात कुठल्याही सरकारला यश आले नाही. आणखी किती वर्षे वाट बघावी लागणार, असा सवाल शहीद गोवारी स्मारकावर आलेल्या गोवारी बांधवांनी सरकारला केला.शहीद झालेल्या गोवारी बांधवांच्या स्मृती जपण्यासाठी सोमवार, २३ नोव्हेंबर २0१५ रोजी विदर्भातील विविध भागातून हजारो गोवारी समाज बांधव स्मारकावर आले होते. स्मारकावर लावलेल्या शहिदांच्या नावाला पुष्प अर्पण करून, श्रद्धांजली अर्पण करीत होते.
टी-पॉईंटजवळील शहीद स्थळही पुष्पांनी सजविले होते. गोवारींच्या काही संघटना रॅलीच्या माध्यमातून स्मारकावर पोहचल्या होत्या. आदिवासी गोवारी अमर रहे च्या घोषणा देत प्रत्येक जण आपला संताप व्यक्त करीत होता. शोकाकुल वातावरणाची अनुभूती स्मारक परिसरात आली. 

 मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यातआली. शहीद गोवारींचे पुनर्वसन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अँड. मिलिंद खोब्रागडे, रमेश दुपारे, विनोद कोवे, पुरुषोत्तम बडगे, अशोक शेटे, ललित बागडे, भाऊराव बोरकर, राजा शेवतकर, सुनीता सोमकुंवर, भागनबाई मेश्राम, शालिक बांगर, बाळासाहेब शंकरकर, भगवान शेंडे उपस्थित होते. 


■ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहीद गोवारी स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, अनिल अहिरकर, चरणजितसिंग चौधरी, महेंद्र भांगे, वेदप्रकाश आर्य, विनोद हेडाऊ, अलोक पांडे, नूतन रेवतकर, अल्का कांबळे, संजय शेवाळे, ईश्‍वर बाळबुधे, रवींद्रसिंग मुल्ला, राजू नागुलवार, रिजवान अन्सारी, नरेंद्र पुरी, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते.


■ अशोक बोरकर यांच्या नेतृत्वात शहीद गोवारी स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उमेश करवते, राजू पवार, प्रकाश वाघमारे, संजय गांधी आदी उपस्थित होते. शहीद गोवारी बांधवांना
न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री
■ अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शहीद झालेल्या ११४ गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी सकाळीच गोवारी शहीद स्मारकावर पोहोचले. यावेळी आदिवासी गोवारी स्मारक समितीचे संयोजक नारायण सहारे, आदिवासी गोवारी समाज संघटन, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कैलास राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांनी संपूर्ण स्मारकाचा आढावा घेतला. शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून, महाराष्ट्र शासनातर्फे श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी शहीद गोवारी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. कृपाल तुमाने यांची शहीद गोवारींना श्रद्धांजली
■ २१ व्या शहीद गोवारी स्मृतिदिनानिमित्त गोवारी शहीद स्मारक येथे खासदार कृपाल तुमाने यांनी भेट देऊन गोवारी बांधवांना शिवसेनेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उपस्थित गोवारी बांधवांना भेटून समाजाच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, सामाजिक सुरक्षा, वस्ती सुधार योजनेसंदर्भात विचारणा केली. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजाचा विषय लावून धरणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

■ माजी मंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत पक्षातर्फे शहीद गोवारी बांधवांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भीमराव फुसे, सुधीर लांडगे, अशोक नगरारे, हेमराज टेंभूर्णे, भरत जवादे, हुसेन फुलझेले, वीरेंद्र शाहू, माया कांबळे, संघमित्रा ढाबरे आदी उपस्थित होते. 

■ मंचतर्फे शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येणार्‍या गोवारी बांधवांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंचचे शैलेश चौधरी, योगेश नेहारे, मनीष मानकर, श्याम शेंदरे, मुकेश राऊत, अमोल सहारे, नीलिमा मानकर, प्रशांत बोरकर यावेळी उपस्थित होते. 

■ ११४ शहीद गोवारी बांधवांना बहुजन समाज पार्टीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सागर डबरासे, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, रूपेश बागेश्‍वर, महेश सहारे, गौतम पाटील, प्रफुल्ल माणके, नरेश वासनिक, आनंद सोमकुवर, भाऊ गोंडाणे, नितीन सिंगाडे, गौतम गेडाम, प्रशांत पाईक, तपेश पाटील, बंटी गेडाम आदी उपस्थित होते. 


■ संघटनेतर्फे गोवारी शहीद बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, डॉ. अनिल हिरेखण, गौतम ढेंगरे, प्रशांत बन्सोड, डॉ. राजाभाऊ टांकसाळे, कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे, रवी पोथारे, डॉ. मिलिंद जीवने, दिलीप नानवटे, सिद्धार्थ बोरकर, संजय मुन, अनिल इलमकर, स्वप्नील बोंदाडे, ललित जीवने, शिरीष भैसारे, विठ्ठलराव डांगरे, प्रल्हाद बहाद्दुरे, अमर रामटेके, पंकज चवरे आदी उपस्थित होते.