शेतकऱ्यांसाठी मुंडेंच्या नावे विमा योजना

0
6

मुंबई  दि.२५-: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे शेतकरी अपघात विमा योजना चालू वर्षापासून राबविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून १२ महिने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली.

या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत ३० नोव्हेंबर रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी २७ कोटी २४ लाख ९३ हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात येणार आहे.