डॉ. प्रकाश आमटे यांना चंद्रपूरभूषण पुरस्कार

0
13

गडचिरोली – चंद्रपूरच्या इतिहासात मानाचं पान स्वकर्तृत्वाने मिरवणारे विख्यात कायदे पंडित तथा सहृदय समाजकारणी, लोकाग्रणी अ‍ॅड. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा २०१४चा चंद्रपूरभूषण पुरस्कार सुप्रसिद्ध समाज सेवक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी अलंकृत पद्मश्री डॉ. प्रकाश मुरलीधर (बाबा) आमटे यांना जाहीर झाला आहे.

रविवारी ३० नोव्हेंबर रोजी सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता स्नेहांकितच्या व्यासपीठावरून हा पुरस्कार डॉ. आमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि दै. ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.