नगरसेवक अनिल पांडे यांचे अपघाती निधन

0
9

गोंदिया,दि.११-येथील नगरपरिषदेचे नगरसेवक अनिल भवानीप्रसाद पांडे यांचे आज सकाळी तिरोडा रिंगरोड जवळील डीपी रिसोर्टसमोर अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुःखद निधन झाले.पांडे हे नियमितप्रमाणे आजही सकाळी मार्निगंवाक करीता आपले मित्र पटेल व ठाकूर यांच्यासोबत गेले होते.त्या दरम्यन अज्ञात ट्रकने यांना धडक दिली यात तिघेही घटनास्थळीच पडले.यात पांडे यांना अधिक दुखापत झाली होती.त्याना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले.उपचारादरम्यान त्यांचा सकाळी ११ वाजता निधन झाले.तर त्यांच्यासोबतचे पटेल व ठाकूर यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पांडे यांच्यावर पार्वतीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्यामागे बराच मोठा परिवार आहे.