सारस संवर्धनासाठी पुढाकार घेणाèयाचा सत्कार

0
9

गोंदिया,दि.२०- गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने हॉटेल गेटवे येथे आयोजित सारस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी सारस संवर्धनासाठी पुढाकार घेणाèया सारस मित्रांचा सत्कार पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह पालकसचिव पी.एस.मीणा व जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.त्या सत्कारमुर्तीमध्ये बबलू चुटे, संजय डोये, गणपती देशमुख, सोमेश्वर कोल्हे, साहेबलाल कोल्हे, हरगोविंद टेंभरे, सलीम शेख, राहूल भावे, जलाराम बुधेवार, प्रवीण मेंढे, कुवरलाल नखाते, नाखराम राणा, विशाल कटरे, तुकडूजी बिसेन, दानवीर मस्करे, अयोध्याप्रसाद मस्करे, कमलेश कांबळे, विवेक खरकटे, मोरेश्वर कटारे, राकेश डोये यांचा समावेश आहे. यावेळी परसवाडाचे सरपंच श्री.रहांगडाले व झिलमिलीचे सरपंच सुरेंद्र ठवरे यां सारसमित्रांचा समावेश होता.त्यांना सारस संवर्धनासाठी बॅग, विंटर जॅकेट, रेनकोट, गमबुट, वॉटर बॉटल, फस्ट एड किट अशा नित्य उपयोगी वस्तू असलेली कीट व प्रमाणपत्र देण्यात आले.