बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0
16

गोंदिया,दि.29-,साप्ताहिक बेरार टाईम्सच्या वतीने  प्रकाशित 2016 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहा्य्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.आज मंगळवारला सडक अर्जुनी येथील तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या सुरवातील बेरार टाईम्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी सुर्यवंशी,पंचायत समिती सभापती कविता रंगारी,उपसभापती शिवणकर,जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी परशुरामकर,तहसिलदार,पोलिस निरिक्षक केंद्रे,गटविकास अधिकारी टेंभरे,जि.प.सदस्या माधुरी पाथोडे,शिला चव्हाण,श्री चुर्हे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.