बायोमट्रीक मशीनकरिता जि.प.नी मागविली पुन्हा निविदा

0
16

गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ दर्जा प्राप्त जिल्हा परिषद म्हणून ओळखली जाते. आयएसओचा दर्जा कायम टिकविण्यासाठी तसेच कर्मचारी, अधिकारी यांना शिस्त लावण्याच्या हिशोबाने कार्यालयाच्या येण्या व जाण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली तीन-चार वर्षापूर्वी अंमलात आणण्यात आली. तत्कालीन सीईओ ज्ञानेश qशदे यांच्या कार्यकाळापासून बायोमेट्रीक प्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोरील वèहांड्यात बायोमेट्रीक यंत्र लावण्यात आले. सुरुवातीला काही दिवस कर्मचाèयांनी याचा नियमित वापर केला. मात्र त्यानंतर काहींनी त्या बायोमेट्रीक मशीनचीच तोडफोड केली. त्यामुळे त्याचा वापरच थांबला गेला. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या बायोमेट्रीक मशीनची कशा पद्धतीने तोडफोड करण्यात आली, याचे बोलके चित्र जिल्हा परिषदेत बघावयास मिळते. त्यानंतरही पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने बायोमेट्रीक मशीन खरेदी करण्यासाठी दुसèयांदा निविदा आमंत्रित करून जिल्हा निधीचा गैरवापर करण्याचा चंगच बांधला की काय? असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या निविदेत तीन नग बायोमेट्रीक मशीन करिता ३० डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आली असून ३१ डिसेंबरला ती निविदा उघडली जाणार आहे. जुन्या बायोमेट्रीक मशीनची झालेली तोडफोड प्रशासनाने गांभीर्याने न घेता उलट पुन्हा निविदा मागविणे म्हणजेच शासकीय निधीला चुना लावण्याच प्रकार असल्याची प्रतिक्रिया बहुतांश नागरिकांनी व कर्मचाèयांनीही व्यक्त केली आहे.