‘अवधूत‘चे गीत अन् प्रेक्षकांचा प्रतिसाद

0
10

गोंदिया,दि.22- देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आज (दि.२२) गोंदियातील आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले  सिने संगीतकार, गीतकार, निर्माता, निर्देशक अवधूत गुप्ते यांनी अल्पवेळातच प्रेक्षकांची मने जिंकून जोरदार प्रतिसाद मिळविला.त्यांच्या भाषणाने समेलनातील प्रेक्षकामध्ये नवी ऊर्जा बघावयास मिळाली. आयोजकांनी त्यांना मार्गदर्शनाकरिता आमंत्रीत केले. सुरवातीलाच अवधूत गुप्ते यांनी ‘कोणता झेंडा घेऊ हातीङ्क हे गीत सादर केले. या गितानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी एकापाठोपाठ एक गीत सादर करण्याची फरमाईश त्यांच्या चाहत्यांनी केली. ‘आयुष्य हेङ्क, ‘शिटी वाजलीङ्क, ‘जय जय महाराष्ट्र माझाङ्क ही गिते त्यांनी आपल्या चाहत्यांकरिता सादर करून वाहवा मिळविली. मला देखील व्यसन आहे. ते व्यसन शब्दांचे असल्याचे अवधूत गुप्ते म्हणाले.माझ्या घरातूनच आधी शब्दांचे नंतर सुरांचे व्यसन लागले.हळूहळू अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता आणि संगितकार होऊन आपल्या संगीतमय शब्द सुरांच्या व्यसनात मी गुंतून गेलो.पंरतु तुम्ही मात्र वाईट व्यसनांच्या आहारी जाऊन आपले व आपले कुटंुब उध््द्वस्त करु नका असा सल्ला दिला.