दारुबंदी होणारा गोंदिया हा ४ था जिल्हा व्हावा-सम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणताबेंकर

0
10

 

व्यसनमुक्तीमध्ये डॉ.आंबेडकारंच्या विचारावरील स्मरणिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन

खेमेंद्र कटरे

गोंदिया, दि.२२ : व्यसनाधिनतेमुळे कुटुबांचीआर्थिक परिस्थितीच नव्हे तर सामाजिक स्थिरता सुध्दा धोक्यात येते.परंतु सध्याच्या परिस्थितीकडे बघता मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये व्यसनाधिनतेला जी प्रतिष्ठा मानली जात आहे,ती अत्यंत धोकादायक अशी आहे.या परिस्थितीला हाताळण्यासाठी व्यसनमुक्तीसोबतच दारुबंदी सुध्दा महत्वाची असल्याने महाराष्ट्रातील पुर्व विदर्भाचा गोंदिया हा जिल्हा दारुबंदीचा निर्णय घेणारा ४ था जिल्हा व्हावा असे विचार समेलनाध्यक्ष मुक्ताताई पुणतांबेकर यानी व्यक्त केले. त्या येथील स्वागत लॉन येथे आयोजित ४थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित समेलनाच्या उदघाटनप्रसंगी सम्मेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या. देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आज (दि.२२) उद्घाटन थाटात पार पडले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त वतीने २२ आणि २३ जानेवारी रोजी गोंदिया येथील स्वागत लॉन येथे देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्वल ऊके यांच्या हस्ते करण्यात आले.समेलनाध्यक्ष मुक्तांगण संस्थेच्या प्रमुख श्रीमती मुक्ताताई पुणताबेंकर होत्या.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते.पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,नगराध्यक्ष कशीश जायस्वाल,अभिनेत्री निशा परुळेकर,अभिनेता,दिग्दर्शक निर्माता अवधुत गुप्ते,समाजकल्याण आयुक्त पियुष qसह,उपायुक्त माधव झोड,जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी,माजी आमदार हेमंत पटले,शारदा बडोले,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप गावडे व स्वागतध्यक्ष रचना गहाणे आदी मंचावर उपस्थति होते.
श्रीमती पुणतांबेकर पुढे म्हणाल्या की, व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. वाढत्या व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंब उद््ध्वस्त झालेत. तरी देखील व्यसनी माणसं यापासून धडा घ्यायला तयार नाहीत. समाजातील वाढती व्यसनाधीनता कमी व्हावी. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागील चार वर्षापासून राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेवून व्यसनमुक्तीचा जागर करीत आहे. एड्स आणि वॅफ्न्सरसारख्या आजारानंतर सर्वाधिक बळी व्यसनाधीन मानसांचा होतो. त्यामुळे वाईट व्यसन समाजातून हद्दपार झालेच पाहिजेत. यंदाचे चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन गोंदियात होत आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात पुर्वीचीच दारूबंदी आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हादेखील दारूमुक्त करण्यात यावा आणि विदर्भातील चौथा दारूमुक्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याचे नाव पुढे यावे, तेव्हाच या साहित्य संमेलनाचे चीज होईल. असे प्रांजळ मत मुक्तांगन संस्था पुणेच्या संचालिका तथा संमेलनाध्यक्षा मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.
पुणतांबेकर म्हणाल्या की, आधी फक्त पुरूषांमध्येच व्यसन आढळत होते. परंतु हळूहळू महिलाही वाढत्या व्यसनाधिनतेच्या बळी ठरू लागल्या. यामुळेच महिलांसाठी मुक्तांगण संस्थेला ‘निशीगंधङ्क नावाचे महिला व्यसनमुक्ती वेंफ्द्र सुरू करावे लागले. घरातील महिलाच व्यसनाधिन होत असेल तर संपूर्ण घर कोलमडते. कुटुंब विनाशाकडे जाते. त्यामुळे ही व्यसनाधिनता समाजातून हद्दपार करणे गरजेचे आहे. दारूच्या उत्पन्नातून शासनाला २१६ अब्ज उत्पन्न मिळाल्याचे सांगितले जाते. परंतु त्याच दारुमुळे झालेली नुकसानभरपाई करण्यासाठी शासनाला २४४ अब्ज खर्च येतो हे सांगितले जात नाही. संपूर्ण दारुबंदी करणे शक्य होत नसेल तर किमान शासनाने दारूची उपलब्धता कमी करावी, जेणेकरून व्यसनाधिनता कमी होईल. आज गोंदिया येथे व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात व्यसनमुक्तीचा जागर केला जात आहे. त्यामुळे पुर्व विदर्भातील दारुमुक्त जिल्हा म्हणून गोंदियाचे नाव झळकेल तेव्हाच हे कार्यक्रम सार्थकी ठरेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मनिषा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संगीतकार अवधुत गुप्ते यांनी आपल्या तालबद्ध मधुर वाणीतून उपस्थितांना व्यसनमुक्तीचा संदेश देत आपणास लागलेले व्यसन हे आपल्या घरातुन शब्द आणि सुरांच्या माध्यमातून मिळाल्याचे सांगितले.वाईट व्यसनाची सवय सोडण्यासाठी आपण संगिताकडे वळा असेही ते म्हणाले.
सिने अभिनेत्री निशा परुळेकर हिने महा पुरूषांचा आदर्श बाळगुन प्रत्येकानेच व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. ज्या बाबासाहेबांनी आपल्या बांधवाना विषमतेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्याच बाबासाहेबांचा अनुयायी समाज तर व्यसनाधिन होत असेल त्यांच्या विचारांना काय अर्थ राहणार असे सांगत थोर महापुरुषांचे पुुतळे चौकाचौकात उभारण्याएैवजी त्यांचे विचार मनात qबबवून व्यसनमुक्त समाज करण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.माजी आमदार हेमंत पटले यांनीही व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक न्यायमंत्र्यानी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे विचार मांडले.जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी आपला जिल्हा नशामुक्त जिल्हा करु असे सागंत प्रेमाचे व्यसन जिल्ह्यात करु अ‍े म्हणाले.समेलनाच्या स्वागताध्यक्ष रचना गहाणे यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यात हे समेलन आयोजित करण्यामागचा हेतू म्हणजे या जिल्ह्यातील युवकांना व्यसनमुक्तीच्या दिशेने नेण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले.तर प्रधानसचिव उके यांनी समाजप्रबोधन व मत सुधारणेतून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सरकारने २०११ पासून धोरण राबविण्यास सुरवात केल्याचे सांगितले.कायक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी व्यसनामुळे समाज बिघडत चालले असू व्यसनमुक्त समाज निर्माण करुन देशातील व्यसनमुक्त गणला जाणारा महाराष्ट्र राज्य हा पहिला राज्य राहिल या उद्देशानेच प्रशासनाचे काम सुरु आहे.या कामात जनतेने तसेचे स्वयसेवी संस्थेने सहकार्य करावे असे आ‹वाहन केले.विकासापासून कोसो दूर गेलेल्या आणि मागास म्हणुन गणल्या जाणाया या जिल्ह्यात हे समेलन भरवून नव्या विचारांची क्रांती या जिल्ह्यातून करण्याचा आपला उद्देश असल्याचेही म्हणाले.संचालन रेणुका देशकर व विवेक अराणे यांनी केले तर आभार अनिल मडामे यांनी मानले.