निवासी निसर्ग शिबीराचे आयोजन;विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

0
34

गोंदिया, २५ : विद्यार्थ्याना नैसर्गिक घडामोडी व जैवविविधतेबाबत माहिती व्हावी याकरीता सातपुडा फाऊंडेशन, वन्यजीव विभाग व सारस महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पोंगेझरा येथे जंगलाला लागून असलेल्या सहा शाळेतील ३३ विद्यार्थी व ६ शिक्षक यांचे दोन दिवसीय निवासी निसर्ग शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन विभागीय वन्यजीव अधिकारी एस.एस. कातोरे यांनी केले. यावेळी सातपुडा फाऊंडेशनचे मुकूंद धूर्वे, वनपाल माटे, रामटेके, मुंडे, मेश्राम तसेच आरएफओ वाढे उपस्थित होते. एस.एस.कातोरे यांनी यावेळी निसर्गाच्या गंमती-जमती, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची माहिती सांगून जंगल व वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यानी घ्यावी असे सांगितले. शिबीरात वनभ्रमंती, निसर्गवाटभ्रमंती, निसर्गखेळ, नैसर्गिक पाणवठ्याची साफ-सफाई, बंधारे बांधणे, कृत्रिम घरटे तयार करणे, असे विविध उपक्रम घेण्यात आले व विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
निवासी निसर्ग शिबीराचा समारोप ‘हिरवळङ्कचे अध्यक्ष रुपेश निबांर्ते यांच्या अध्यक्षतेत डॉ. ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शिबीराला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‍मंगेझरीचे मच्छीरके सर, सलीमकुमार धूर्वे, जीवराज सलाम, पंकज सलाम, प्रकाश, मंगेझरीचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.