अदानी फाऊडेंशनच्यावतीने व्यसनमुक्त उपक्रम

0
13

गोंदिया : ग्रामीण नागरिकांमध्ये असलेली व्यसनाधीनता आणि त्यातून त्यांच्या आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम पाहून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी तिरोडा परिसरातील गावांमध्ये अदानी फाऊंडेशनने जनजागृती सुरू केली. याचे सकारात्मक परिणाम समोर येत असून आतापर्यंत १९४ युवकांनी व्यसनापासून दूर जाण्याचा संकल्प केला आहे.
तिरोड्यातील अदानी प्रकल्पाच्या परिसरातील गावांमध्ये अदानी फाउंडेशनकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात प्रामुख्याने शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण भागतील सुविधांचा विकास आणि नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ५0 गावांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातूनच नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी अनेक उपक्रम घेण्यात आले. त्यात अनेक नागरिक व्यसनाधीन होऊन त्यातून त्यांचे आरोग्य बिघडत जात असल्याचा अनुभव आला. त्यामुळे नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेणे सुरू केले. त्यात ४४ गावांमध्ये पथनाट्यातून जागृती करण्यात आली. ग्रामीण नागरिकांच्या त्यांना समजेल अशा पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमांना महिला-पुरूषांसह, युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांनीही मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे यातून प्रेरित होऊन अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प जाहीर केला.