खाजगी प्रवासी बसला अपघात

0
8

गोंदिया : एका खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उतरल्याने अपघात झाला. जवळील गोंदिया-बालाघाट राज्य महामार्गावरील ग्राम नागरा येथे गुरूवारी (दि.२८) दुपारी ३ वाजतादरम्यान ही घटना घडली. या अपघातात सुमारे १0-१५ प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे.
बालाघाट येथील पवन ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमपी ५0/पी 0५0४ बालाघाट येथून प्रवासी घेऊन गोंदियाला येत होती. ३0 हून अधिक प्रवासी भरून येत असलेल्या या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नागरा जवळ रस्त्याच्या कडेला उतरली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सुरक्षा भिंतीला लागूनच असलेल्या झाडाला धडकली.