ग्रंथोत्सवाच्या उदघाटनाकडे निमंत्रित पाहुण्यांनी फिरवली पाठ

0
15

गोंदिया दि.29: महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, बालकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचन संस्कृती रुजावी यासाठी तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन आजपासून शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.
शासनाचा मराठी भाषा विभाग, मराठी राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ, जिल्हा माहिती कार्यालय व शारदा वाचनालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा ग्रंथोत्सव होत आहे.परंतु या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनासाठी ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्या  पाहुण्यांनीच या ग्रथोत्सवाच्या उदघाटनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
सामाजिक न्यायमंत्नी तथा जिल्हयाचे पालकमंत्नी राजकुमार बडोले यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे उपस्थित राहणार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जि.प.(सामान्य प्रशासन) उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम उपस्थित राहणार होते.परंतु या सर्वांनी पाठ दाखविल्याने वेळेवर आयोजकांना उदघाटन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते एस.एस.गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली करावे लागले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज.सु.पाटील,वाचनालायाचे सदस्य श्री बैस,वाचनालय संघाचे अॅड.श्रावण उके,सुरेश गिर्हेपुंजे,चौरागडे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन महोत्सवाला सुरवात करण्यात आली.गल्स महाविद्यालयाच्या विद्यार्थीर्नीने स्वागत गीत सादर केले.जिल्हा ग्रंथालयात अभ्यासाठी जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.