महाचर्चेत वक्त्यांनी दिला ग्रंथवाचनाने सुसंस्कृत होण्याचा संदेश

0
44

गोंदिया,दि.३० : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ गोंदिया व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने शारदा वाचनालय येथे आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (ता.३०) ग्रंथाने काय दिले याविषयवार महाचर्चेचे आयोजन करण्यात आले. या महाचर्चेत नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोठेवार, नागपूर गांधीस्मारक वाचनालयचे सचिव सुनिल पाटील, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगावच्या प्रा. तोषिका पटले, नमाद महाविद्यालयाचे प्रा.एस.बी.रामटेके, डिलेश्वरी टेंभरे, तरुण पुंडे यांनी सहभाग घेतला.
डॉ. कोठेवार म्हणाले, ग्रंथ मनुष्याला जीवन जगण्याचे बळ देतात. ग्रंथामुळे जीवनाचा पाया भक्कम होतो. तर ग्रंथ वाचनाने मनुष्य सुसंस्कृत जीवन जगण्याची कला आत्मसात करतो. मनुष्य परिपक्व होतो व त्याल संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होते. भूतकाळाचा विचार न करता आपले ध्येय गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची ताकत ग्रंथ देतात. म्हणूनच उपस्थित युवक-युवतींना डॉ. कोठेवार यांनी साने गुरुजींच्या आईने त्यांना दिलेला संदेश, ‘बेटा, शिक व मोठा होङ्क अत्यंत कळकळीने दिला.
सुनिल पाटील यांनी अभ्यासासाठी केलेले वाचन व ग्रंथवाचनातील फरक सांगितला. परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेले वाचन तात्पूरते ठरते. तर ग्रंथवाचनाने जीवनाला दिशा मिळते. ग्रंथामुळे महापुरुष घडले व महापुरुषांनी ग्रंथातील दिलेल्या संदेशामुळे आपण घडतो असे सांगितले.
प्रा. तोषिका पटले म्हणाल्या, की जीवनात ग्रंथ सर्वत्र आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्यासाठी त्या मार्गावर वळले पाहिजे. लोकशाही सूदृढ करण्याचे ग्रंथ काम करतात. आपण कितीही आधूनिक झालो, तंत्रज्ञानाने अद्ययावत झालो तरी ग्रंथाची महत्ता आपण नाकारु शकत नाही.संतुलित समाज निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ करतात. असे त्या म्हणाल्या.
प्रा. एस.बी.रामटेके यांनी मनुष्याने मनुष्यासारखे वागावे अशी शिकवण ग्रंथ प्रदान करतात असे सांगून ग्रंथातील एका संदेशात मनुष्याचे अवघे जीवन बदलवून टाकण्याची क्षमता असते असे सांगितले. महाचर्चेत डिलेश्वरी टेंभरे व तरुण पुंडे यांनीही ग्रंथाची महत्ता सांगितली. ग्रंथ मनुष्याला अखेरपर्यंत साथ देतात. जीवनात संवेदना, तरलता, प्रगती, उत्कर्ष सर्व काही ग्रंथ प्रदान करतात असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विद्या ठाकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन युवक-युवती, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
बहारदार सादरीकरणाने रंगले कवी संमेलन
ग्रंथोत्सवातील दुपारच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कवी संमेलनात कवी सर्वश्री मदन पांडे, शाहीद अन्सारी शफक, प्रमोद शाहू, चैतन्य मातुरकर व कवियत्री सविता सरोज यांनी आपल्या कवितांच्या उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
प्रथम चैतन्य मातुरकर यांनी आपल्या काव्यातून मराठी भाषेचे महात्म्य विशद केले. मराठी भाषेवर प्रेम करा असा संदेश आपल्या काव्यातून दिला.
‘माय मराठीची व्यथा, काय सांगू राव तुम्हाला
अपुरी ती सांगायला, व ऐकायला थोडी आहे
ज्ञानोबा, तुकडोबा, मुक्ताबाई, जनाबाई
अंभगाची नांदी होत नाही आता इथेङ्क

यांच्यावरील प्रेम व्यक्त करतांना ‘दिल हा गुलाम झालाङ्क ही गझल सादर केली.

‘ वेडावला शहारा, श्वासांना गंध आला,
तुझिया स्पंदनाचा, दिल हा गुलाम झाला
ओल्या तुझ्या बटांना, हळूवार गोंजराया
तुझिया स्पंदनाचा, दिल हा गुलाम झालाङ्क
शफक यांनी युवकांच्या चंचल मनाचा वेध घेत काव्याचे सादरीकरण केले.
‘मोहब्बतमे दुख सुख उठाता रहूगा, यूही जिंदगांनी बिताता रहूगा
मोहब्बत के नक्शे नयी जिंदगींके, बनाता रहूगा मिटाता रहूंगा और
निगाहे तुम्हीसे मिलाता रहूंगा, चुराता रहूंगा
देशभक्तीपर काव्य सादर करतांना ते म्हणाले,
ये हमारा वतन है, हमारा वतन, की जिसने तोडी गुलामी की जंजीर है
और जिसपे बिखरी उसपे जमी कश्मीर है, जिसके धरतीपर बिखरा है गांधी का खून
जो अंहिसा की जिंदा तसवीर है, इससे दामन बचाके क्या पाओंगे, दूर जाकर नजदीक कल आओंगे,
ऐसा शफक याद रखना नसीहत है, इसके दुश्मन बनोंगे तो मिट जाओंगे
पुढील गझल सादर करतांना ते म्हणतात,
जमानेको करवट बदलतेही देखा, जो सुरज चढा उसको ढलतेही देखा
इन हसीनोंमे अदा एक पायी, दुपट्टे को सिरसे फिसलतेही देखा
ना पुछे कोई तेरी आँखो का आलम, हर आलम को आलममे ढलतेही देखा
शफक हमने दुनियाके लाखो दिलो को, जवानी के शोलोमे जलतेही देखा
शेर सांगतांना ते म्हणाले,
किया हू कोशिश उसे भूलाने की, और याद वो जिद है बार बार आने की
वो जो रुठे है मान जाऐगे, देर है बस मेरे मनाने की
मरनेवाले तो खुदही मरते है, बस जरुरत है हाथो को उठाने
प्रमोद शाहू यांनी देशभक्तीपर काव्य सादर करतांना सांगितले,
जहापे सजदे किये थे उन दरो को याद रखियेगा, घरों मे रहेके बेघरी को याद रखियेगा
कोई अब शाल के बदले साडी देता है तो, सरहद पर सर कटे थे उन सरो को याद रखियेगा
वाढत्या महागाईची विवचंना त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली.
महागाई म्हणे भ्रष्टाचाराला तू माझा भाऊ, अन नेत्यांच्या हाथाखाली आनंदाने राहू
कर्जापायी शेतकरी फासावर चढे, शासन म्हणे रोज मरे त्याला कोन रडे
सविता सरोज यांनी आपल्या शब्दातून छोटीशी कथा व्यक्त केली.
आज मशहूर फीर शहरमे, यार की एक कहानी हूई
एक लडका दिवाना हूआ, एक लडकी दिवानी हूयी
मेरे आँखो के गहराईमे, सबने चेहरा तेरा पढ लिया
आज मन आईना देखकर, शर्म से पानी पानी हो गया
एक तुफान था थमसा गया, प्यार करने का मौसम गया
वो भी पागल पुराना हूआ, मै भी पागल पुरानी हूयी
कवी संमेलनाचे संचालन कवी मदन पांडे यांनी केले. यावेळी युवक-युवतींनी टाळ्यांच्या कडकडाटात कवींच्या बहारदार सादरीकरणाला दाद दिली.