हुतात्म्यांना अभिवादन

0
18

गोंदिया,दि.३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज ३० जानेवारी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी उमेश काळे, लेखाधिकारी बावीसकर यांचेसह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयातसुध्दा एका कार्यक्रमात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहायक पल्लवी धारव, शामू कवासे, धम्मदिप बोरकर, पंढरीनाथ लूटे, नारायण लिमजे व अतूल भलावी यांची उपस्थिती होती.