वैकल्पिक वाद निवारण केंद्र समाजाला नवी दिशा देणार-न्यायमुर्ती गवई

0
29
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.30 : येथील नवनिर्मिती वैकल्पीक वाद निवारण केंद्राची ही इमारत पक्षकारांसह सामान्य जनतेलाच नव्हे तर न्यायव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. पक्षकार, वकील व न्यायालय यांच्यातील दूवा म्हणून ही यंत्रणा उपयोगी ठरणार असून गोंदियाच्या विस्तारीत कौटुंबीक न्यायालयाचा इमारतीचा प्रश्नही लवकरच निकाली काढून येत्या काही दिवसात या इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दिली.ते येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवनिर्मित इमारतीच्या उदघाटनप्रसंगी आज शनिवारला (दि.30)बोलत होते.  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. पी.एन.देशमुख, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या सदस्य सचिव स्वप्ना जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरटकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी मंचावर  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक श्रीमती आय.ए.शेख/नाजीर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.टी.बी.कटरे उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना न्यायमुर्ती गवई म्हणाले की, गोंदिया बार असोसिएशनचे हे स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे. या बार असोशिएशनच्या माध्यमातून अनेक वकील या न्यायालयातून उच्चपदावर पोहचले आहेत. त्या सर्वांच्या कार्याचा आदर्श पुढे कायम ठेवण्याची परंपरा सुरु ठेवायची आहे.प्रलबिंत असलेले खटले आणि दररोज वाढत असलेला व्याप बघता या वैकल्पिक वाद निवारण केंद्रातून एकमेकाविरुध्द तक्रार करणारे दोघेही व्यक्तींच्या मनातील भांडणाची भावना दूर करुन त्यांना हसत खेळत परत पाठविण्याची राहणार आहे.वकिलमंडळीनी वाद वैकल्पिक केंद्रातून आपल्या व्यवसायावर परिणाम होईल याची भिती मनात बाळगू नये.उलट न्यायालयात न्याय मिळण्यासाठी आजोब्याने घातलेल्या खटल्याच्या निकाल त्याच्या नातवाला बघायला मिळणार नाही,याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे म्हणाले.त्याचप्रमाणे गोंदियाच्या न्यायालयीन नव्या इमारतीच्या जागेचा वाद सुरु आहे,त्या वादात आपण जाणार नाही.परंतु लवकरच जागेचा प्रश्न मार्गी लागून न्यायालय आणि वकिलांना सोईस्कर ठिकाणीच कौटुंबिक न्यायालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालक न्यायाधिश यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्याचे पालक न्यायाधिश पी.एन. देशमुख यांनी जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी वाद वैकल्पीक वाद निवारण वेंâद्राची संकल्पना वरिष्ठांकडे ठेवून यासाठी १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मिळालेला निधी राज्यातील २७ जिल्ह्यांना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.या केंद्रासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये या प्रमाणे हा निधी देवून कुठलेही काम थांबणार नाही, याचीही दखल घेण्यात आली. गोंदियालाही 1 कोटी देण्यात आले.परंतु बांधकाम विभागाने सुस्सज्ज अशी सर्व साहित्यांसह फक्त ८८ लाखात ही इमारत तयार करुन दाखविल्याचेही ते म्हणाले. मी या जिल्ह्याचा पालक न्यायाधीश आहे. आणि माझी ही पहिलीच भेट आहे. वाद वैकल्पीक निवारण वेंâद्राची संकल्पना आपलीच असून आपल्याच उपस्थितीत या केंद्राचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे.
महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या सदस्या न्यायाधीश स्वप्ना जोशी म्हणाल्या की, माझ्या माहेरी होत असलेल्या या कार्यक्रमामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे. आपली सुरूवात याच न्यायालयातून झाली. आपल्या वडीलांसह आजोबांनीही इथेच वकिलीचे काम केले ही माझ्याकरीता अभिमानाची बाब आहे. या वाद वैकल्पीक निवारण केंद्राच्या उदघाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार मानत, वैकल्पिक केंद्राच्या माध्यमातून देशभरात २४ लाख प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती दिली. तर महाअदालतीच्या माध्यमातून ५६ टक्के प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण राहिल्याचेही त्या म्हणाल्या. बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड टी.बी.कटरे यांनी बार असोशिएशनला शंभर वर्ष पुर्ण होत असल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांना उपस्थित राहण्यासंबंधी न्यायमूर्ती गवई साहेबांनी आमचे निमंत्रण त्यांना द्यावे आणि त्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून बार असोशिएशनच्या शंभर वर्षाच्या इतिहासाला नवी दिशा देण्याचे सहकार्य करावे, सोबतच वकीलांना शोधनिबंध मांडण्याची परवानगीही देण्यात यावी, असे म्हणाले.सुरूवातीला द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हासत्र न्यायाधीश गिरडकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपण आलो तेव्हा न्यायालयात खुप अडीअडचणी होत्या, सुमारे १८ हजार केसेस प्रलंबीत होते. पण वकील पक्षकारांच्या माध्यमातून आणि लोकअदालत व महालोक अदालतीच्या माध्यमातून पेंडंसी कमी करण्यात आली. आज हा आकडा १६ हजारावर येवून पोहचल्याचे सांगत येतील वकील न्यायाधीश आणि इतर यंत्रणाचा चांगला सहकार्य मिळत असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड.होतचंदानी यांनी केले तर आभार न्यायधीश श्रीमती आय.ए.शेख यांनी मानले. यावेळी पशीने विद्यालय दासगावच्या विद्याथ्र्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर नमाद विधी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी स्वागत गित सादर केले. वृक्षारोपणाने कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसह इतर न्यायालयातील न्यायाधीश,वकील, अॅड.के.आर.शेंडे,अॅड.वीणा बाजपेयी,अॅड.पराग तिवारी,अॅड.राजकुमार बोंबार्डे,बापट,अॅड.पी.सी.चव्हाण,येशुलाल उपराडे,प्रशांत संगीडवार,अॅड.हरिणखेडे,अॅड.कातोरे,अॅड.बोरकर,अॅड राजनकर,अॅड.बघेले,अॅडा.ब्राम्हणकर,अॅड.नागपूरे आदी वकीलमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.