गर्रा येथे राजाभोज प्रतिमेचे अनावरण

0
17

महेश येळे

रावणवाडी(गोंदिया)दि.13-येथून जवळच असलेल्या गर्रा येथे ग्रामीण पोवार समाज मंडळाच्यावतीने पोवार समाजाचे राजा चक्रवर्ती राजाभोज यांच्या जंयती निमित्त आज शनिवारला आयोजित एका कार्यक्रमात राजा चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,आनंदराव तुरकर,पोवार समाजाचे अध्यक्ष डाॅ.कैलाशचंद्र हरिणखेडे यांच्यासह इतर मान्यवर समाजबांधव उपस्थित होते.