जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलाव जोडो अभियान

0
9

गोंदिया,दि. १६ : शेतीला बारमाही पाणी मिळावे, यासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सोनेगाव येथील तीन तलावांना एकत्रीत करून जलसाठ्यात वाढ करण्याचे काम आमदार विजय रहांगडाले यांनी हाती घेतले आहे. पूर्वी या तलावांतून ४०० हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा होत होता. मात्र, तलाव एकत्रीकरणाने एक हजार हेक्टर जमिनिला आता पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकèयांना धान पिकांव्यतिरिक्त इतरही पिके घेता येणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेला शासनाकडून आवश्यक तेवढा निधीचा पुरवठा होणार आहे. आमदार विजय रहांगडाले यांनी सोनेगावची निवड करून तेथील शेतकèयांना आनंदाची बातमी दिली आहे. अवघ्या एका महिन्यातच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन तलावांच्या एकत्रीकरणाने शेतीतील पिकांची वाढ होईल, शेतकरी सुखी होईल,असे मतही आमदार रहांगडाले यांनी व्यक्त केले.
तीन तलावांचे एकत्रीकरण कसे करता येईल याबाबत प्रत्यक्ष पाहणी आमदार रहांगडाले, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, कार्यकारी अभियंता निखारे, पताहे, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, मंडळ अधिकारी, सरपंच राजेश तुरकर यांनी केली. या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार रहांगडाले यांनी या गावाच्या विकासाची हमी घेतल्याने शेतकèयांच्या चेहèयावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.