दारूबंदी करणाèया महिलांसह पुरुषांना विक्रेत्याची धमकी

0
11

गोंदिया-गोरेगाव पोलीस ठाण्यातंर्गत येणाèया दवडीपार येथे दारूबंदी असतानाही गावातील काहीजण दारूविक्री करीत असल्याची कुणकुण दारूबंदी समितीला लागली.तेवढ्यातच गोंदिया येथील कुणी बावनकर दारू दुकानात काम करणारा नरेश नारायण तरोणे हा युवक दुचाकीने पाच पेठ्या दारू घेऊन दवडीपार येथे पोचला असता महिलांसह पुरुषांनी त्याला विरोध केला.आणि लगेच गोरेगाव पोलिसांना माहिती दिली.तोपर्यंत सदर नरेश नामक युवकांने ग्रामपंचायत सदस्यांसह काहीना तुम्हाला बघून घेऊन अशी धमकी दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पोलिसांनी सदर युवकाला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्याच्याकडून एक दुचाकी वाहन आणि पाच पेठ्या देशी दारू अशा सुमारे ५२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र qशदे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.