धमदीटोला परिसरात आढळले 754 जिवंत काडतुस

0
9

 

गोंदिया,दि.19-जिल्ह्यातील देवरी तालुक्यातंर्गंत येणार्या चिचगड पोलीस ठाणेतंर्गतच्या धमदीटोलाच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेलेली कारतुस शोध मोहिमेंदरम्यान आढळून आल्याची घटना गुरुवारला(दि.18) घडली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सीपीआय़ माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांनी भारत सरकार विरुध्द लढा चालविण्यासाठी मोठ्याप्रमाणात जमिनित काडतुस साठा लपवून ठेवला होता.तो साठा शोधून काढण्यात गोंदिया पोलीसांना यश आले आहे.इंडियन आर्डनस फॅक्टरीमध्ये तयार झालेले 315 चे 754 जिवंत काडतुस आढळून आली आहेत.हे कृत्य गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात सक्रिय असलेल्या केकेके दलम च्या सदस्यांनी पोलीस पार्टीवर घात करण्याच्या उद्देशाने ठेवल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे.याप्रकरणी चिचगड पोलीसा गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध मोहीम सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक सुरेश भवर यांनी दिली आहे.