कवलेवाडा येथे निशुल्क रुग्ण तपासणी शिबीराला प्रतिसाद

0
30

गोंदिया,दि.22-गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे स्व.नर्मदाबाई सुरजलाल ठाकूर यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ रविवार दि.21 फेबुवारीला  आयोजित  निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराला परिसरासह गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या आरोग्य तपासणीमध्ये 200 च्या जवळपास रुग्णांची तपासणी करुन त्यांना प्राथमिक औषधोपचार देण्यात आले.यावेळी ठाकूर कुटुबियंानी रक्तदान केले. आयोजन करण्यात आले आहे.शिबिरात बालाघाट येथील हृद्यरोग तज्ञ डाॅ.नरेंद्र हरिणखेडे,गोंदिया मेडीकल असो.अध्यक्ष डाॅ.घनश्याम तुरकर,डाॅ.दिगबंर पारधी,डाॅ.विशाल एम. पटले,डाॅ.संजय भगत,डाॅ.कविता भगत,डाॅ.प्रशांत तुरकर,दंतचिकित्सक डाॅ.पकंज बिसेन,डाॅ.विनिता तुरकर ,नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.रवी भांगे ,डाॅ.चंद्रशेखर राणा,डाॅ.पारधी यांच्यासह इतरांनी रुग्णांची तपासणी केली.यावेळी श्री गुरुदेव आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेव किरसान, मधुकर ठाकूर,यादव ठाकूर,तिलक ठाकूर,हेमंत ठाकूर आणि अॅड जय ठाकूर ,डाॅ.संजीव रहागंडाले यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.