खा. प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसाप्रसंगी पाथरी येथे विविध कार्यक्रम

0
9

गोरेगाव: खा. प्रफुल्ल पटेल यांनी निवड केलेल्या आदर्श ग्राम पाथरी येथे खा. प्रफुल्ल पटेल व मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त पं.स. सदस्य केवल बघेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसाप्रसंगी पाथरी भुताईटोला येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित, पाथरी येथे दोन समाजमंदिर व व्यायाम शाळांचे भूमिपूजन, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिर, उत्पन्न, जात व डोमीसाईल प्रमाणपत्र शिबिर, हळदी-कुंकू कार्यक्रम, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या नागरिकांना माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य ललिता डुमेश चौरागडे होत्या. अतिथी म्हणून अदानी पॉवरचे सुबोधसिंग, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पशू चिकित्सक सरगर, डॉ. नासरे, दंत चिकित्सक डॉ. धर्मेंद्र टेंभरे, डुमेश चौरागडे, अनिता तुरकर, पुष्पन भुरकुंडे, मुलचंद खांडवाये, आदेश फुले, संतोष रहांगडाले, लिलाराम कटरे, जियालाल बघेले व ग्रामस्थ उपस्थित होते.
संचालन ग्रामसेवक चौधरी यांनी केले. आभार ममता जनबंधू यांनी मानले. कार्यक्रमासाठी आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.