ग्रामसेवक लोकेश बागडे यांचे अपघाती निधन           

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.22- तालक्यातील प्रतापगड व रामनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लोकेश केशवजी बागडे यांचे आज 22 फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झाले. ग्रामसेवक लोकेश बागडे हे आपल्या मुळगांव पळसगांव ( सोनका) येथुन दुचाकीने पत्नी सोबत अर्जुनी मोर कडे आपल्या नोकरीच्या गावाकडे येत असतानी त्यांच्या दुचाकीला सकाळी 9 ते9:30 वाजेच्या दरम्यान अपघात झाला. लगेच त्यांना नागपुर येथील खाजगी रुग्नालयात हलविन्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मृत्यु समयी ते 36 वर्षाचे होते. 23 फेब्रुवारी ला दुपारी 12 वाजे त्यांचेवर पळसगांव सोनका येथे अंत्यसंस्कार होणार आहे त्यांचे पश्य्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा व एक मुलगी व बराच मोठा मित्रपरिवार आहे .