9 कोटीच्या संभाव्य खर्चाला सभेत मंजुरी

0
7

गोंदिया : मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेत सोमवारी आयोजित अर्थसंकल्प सभेचा गोंधळातच शेवट झाला. दुपारी १ वाजतापासून रात्री ७.४५ वाजेपर्यंत चाललेल्या या सभेत २०१६-१७ करिता ९ कोटी २७ लाख २५ हजार ४०० रुपयांच्या संभाव्य खर्चाला सत्ताधारी पक्षांनी बहुमताच्या आधारे मंजुरी दिली.

आधी २०१५-१६ च्या सुधारित अर्थसंकल्पावर चर्चा होऊन ७ कोटी ८९ लाख ९८ हजार २८० रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१६-१७ च्या संभाव्य खर्चावर चर्चा झाली. दुपारी १ वाजता सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे होत्या. याशिवाय जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळीही जि.प.अध्यक्षांनी पत्रकारांना प्रवेशासंदर्भातली कुठलीच भूमिका स्पष्ट न केल्याने काँग्रेसच्याच पदाधिकायाना पत्रकार सर्वसाधारण सभेला नकोत असे दिसून येत आहे.