बाबासाहेबांची १२५ वी जयंती राकाँ जिल्हाभरात साजरी करणार

0
7

भंडारा ,दि.26: भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हास्तरीय सामाजिक न्याय विभागाची सभा राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात पार पडली.जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येईल असे सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव धनंजय दलाल होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, जि.प. सभापती नरेश डहारे, माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद फुलेकर, डॉ.रविंद्र वानखेडे, नंदू झंझाड किसनाबाई भानारकर उपस्थित होते.


यावेळी संजय सतदेवे, शैलेश मयूर, डॉ.यशवंत मडामे, दिपक चिमणकर, दिलीप गजभिये, विजय पारधी, मनोज वासनिक, डॉ.अरुण गजभिये, एल.टी. भावे, निता टेंभुर्णेकर, मनोरथा जांभुळे जि.प.सदस्य, कौशल्या नंदेश्‍वर शिला वासनिक, अरुण गोंडाणे, कमोद सरादे, विजय सुखदेवे, प्रशांत मेश्राम, चंद्रकला बडोले, मनोज बोरकर भोजराज येवले, शिलबंधू भिवगडे, दीनदयाल देशभ्रतार आदी मान्यवर उपस्थित होते.