आरोग्यमंत्र्याच्या हस्ते ओपारा पूल व पशुवैद्यकीय दवाख्यान्याचे लोकार्पण

0
18

लाखांदूर,दि.26 : जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे. गावांच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून जनतेच्या विश्‍वासाला युती सरकार तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील ओपारा पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.तसेच लाखांदूर येथील राज्य पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  आमदार राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, पं.स. सभापती मंगला बगमारे, नगराध्यक्षा नीलम हुमणे, नगरपंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, सरपंच राजू राऊत, उपसरपंच राहुल राऊत, सभापती विनायक बुरडे, जि.प. सदस्य प्रदीप बुराडे, मनोहर राऊत उपस्थित होते.
यावेळी आमदार काशिवार म्हणाले, मतदारानी पहिली पसंती दिल्याने विकासकामातून ऋण फेडणार असल्याचे सांगून यापुढेही गावात विविध विकासकामे केली जातील. विधानसभा क्षेत्र विकास कामापासुन वंचित राहनार नाही. शेतकरी सर्वसामन्यांच्या अडचणी तसेच युवकाना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले. 

लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी डाक्टरांनी चांगली वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन  केले. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, नगर पंचायत सदस्य, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.