कुसूमताई चव्हाण सामाजीक पुरस्कार सहा कर्तृत्ववान महिलांना जाहीर

0
13

नांदेड,दि.26-मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने जागतीक महिला दिनी कर्तृत्ववान व आपल्या कार्याने लौकीक मिळवणार्‍या प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा कुसूमताई चव्हाण सामाजीक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.जागतीक महिला दिनी दरवर्षी देण्यात येणार्‍या कुसूमताई चव्हाण सामाजीक पुरस्कार निलीमा कुलकर्णी, नम्रता वागळे व सिमा कदमसह सहा कर्तृत्ववान महिलांना जाहीर झाला असून दि.8 मार्च  रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. 

 यावर्षी स्वतःचे स्त्रीधन म्हणजे मंगळसुत्र विकून शौचालय बांधले म्हणून त्यांना शासनाने स्वच्छता दुत म्हणून नेमणूक करणार्‍या सौ.संगीता आव्हाळे, आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सेलीब्रीटीजच्या मुलाखती घेण्यास तरबेज असणार्‍या अष्टपैलू सुत्रसंचालक निलीमा कुलकर्णी, ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे यांची प्रेरणा घेऊन ऊसतोड कामगारासह अनाथ मुला-मुलीसाठी शांतीवनसारखा प्रकल्प चालवणार्‍या सौ.कावेरी नागरगोजे, संरक्षण पत्रकारितेत पदवी मिळवून अल्पावधीतच आपला वेगळा प्रभाव निर्माण करणार्‍या एबीपी माझाच्या नम्रता वागळे, कॅरीऑन देशपांडे या चित्रपटातून आपले कॅरीअर सुरू करून आपल्या अभिनयातून चमक दाखवणार्‍या नांदेडच्या भूमीकन्या सिमा कदम तसेच बचत गटाची चळवळ सुरू करून शेळी पालनातून महिलांचा आर्थिक विकास करणार्‍या सौ.सविता आघाव यांचा सदरील पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे दिलीप तेलंग, दिलीप माहोरे, भूमन्ना आक्केमवाड, श्रीमती पुनीता रावत, सौ.संगीता बारडकर, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.जयलक्ष्मी गादेवार, सौ.विजया चिद्रावार, सौ.विजया कटकमवार, सौ.हेमा बारडकर, श्रीमती सुचीता मुत्तेपवार, सौ.रूपाली रघूजीवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.(साभार नांदेडलाई)