२० मार्च जागतिक चिमणी दिन

0
12

गोंदिया, दि. २० -आज २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. एक होती चिऊ. एका होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं. ही पुर्वापर चालत आलेली गोष्ट आपल्याला बालपणी आवडायची. पण सध्या काही वर्षांमध्ये चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. 

पुर्वीच्या काळी शहरासह ग्रामीण भागात मातीची घरे होती. मात्र बदलत्या काळानुसार मातीची घरे जमीनदोस्त झाल्याने सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली. शहरातील झाडे मोठया प्रमाणात तोडली या वन बीएचकेच्या जंगलात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच उरली नाही. याचा परिणाम म्हणून चिमण्यांची संख्या हळूहळू कमी झाली.