पी.जी.शहारे गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

0
8

गोंदिया,दि.21– ग्रामविकास विभागामार्फत यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रविवार(दि.20) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात गौरव करण्यात आला.यावेळी नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी पी.जी.शहारे यांना उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार शहारे यांना राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते देण्यात आला.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मुकाअ दिलीप गावडे,अति.मुकाअ जयवंत पााडवी,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ पुराम यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी व इतर त्यांच्या हितचितकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.