युवा स्वाभिमानची ककोडी आरोग्य वेंâद्राला भेट

0
9
देवरी,दि. २१ – तालुक्यातील ककोडी येथील मंडईत १५ मार्च रोजी मिष्ठान व गुपचून खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली. ककोडी येथील महेश कपुरडेहरिया  या बालकाचा उपचारादरम्यान चिचगड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी आपल्या कार्यकत्र्यांसह ककोडी येथील प्राथमिक आरोग्य वेंâद्राला भेट दिली.
ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन झालेल्या विषबाधेसंदर्भात वैद्यकीय अधिकारी जी.एच.काळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्यासह देवरीचे तालुकाध्यक्ष भरत शरणागत, डॉ.भुमेश पटले, डॉ.रहांगडाले, अमोल कटरे, ओ.के.पटले, आदेश मेश्राम, अजयकुमार पटले, अश्विन वंजारी, हितेश कोचे, मुकेश चालखोर, मुकुंद पारधी, प्रदिप शहारे, ईश्वर ऐळमे, आशिष खतवार, विकास पटले आदि उपस्थित होते.