कवयित्री उषाकिरण आत्राम यांची नियुक्ती

0
24

सालेकसा(गोंदिया)  : सालेकसा तालुक्यातील धनेगाव (कचारगड) येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार आणि चिंतनशील लेखिका श्रीमती उषाकिरण आत्राम यांची महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद, पुणेच्या कार्यकारी मंडळावर कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर कार्यकारी मंडळ २०१६ ते ३१ मार्च२०१९ या त्रैवार्षिक कालावधीसाठी आहे. या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी ए.आर. वाळींबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद पुणेचे सचिव ग.शां. पंडित यांनी या नियुक्तीबद्दल ३१ मार्चच्या एका पत्राद्वारे कळविले असून उषाकिरण आत्राम यांचे अभिनंदन केले आहे. या संस्थेच्या मंडळावर डॉ. रमेशचंद्र अवस्थी, अ‍ॅड. सुरेखा दळवी, डॉ.संजय जुवेकर, डॉ. अभय कुदळे, डॉ.आरती नगरकर, लवू नारायण गावडे आणि डॉ. रोहित रामचंद्र मुटाटकर हे सुद्धा कार्यकारी सदस्य आहेत.
आदिवासी भाषा संशोधन प्रकल्पाच्या संचालिका असलेल्या उषाकिरण आत्राम यांच्या या नियुक्तीबद्दल सतीश पारधी, माणिक गेडाम, युवराज गंगाराम, सुन्हेरसिंह ताराम, डॉ.विजय खंडाते, अर्चना खंडाते, अर्चना सयाम, शंताली शेडमाके, भिन्न भाषी साहित्य मंडळाचे शशी तिवारी, रमेश शर्मा आणि मनोज जोशी यांनी अभिनंदन केले आहे.