गोदामाना आग लागून  लाखोंचे नुकसान

0
11

गोंदिया,  : गणेशनगरातील बारदाना ठेवलेल्या तीन गोदामांना आज सोमवारी सकाळी आग लागल्याने गोदामातील लाखो रुपयांचा बारदाना जळाला. नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाने सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली.
मनोहर चौक आणि गणेशनगर यांच्या दरम्यान असलेल्या प्रताप लॉनजवळ बारदान्याचे गोदाम आहेत. कुकूस, धान, तांदूळ यांच्याकरिता वापरण्यात येणारा बारदाना येथे ठेवण्यात येतो. त्याचप्रमाणे बारदाना शिवण्याचे देखील येथे काम दररोज सुरू असतो. रविवारी(ता.१७) मजूर गोदाम बंद करून घरी गेले. आज पहाटे गोदामांना आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती तातडीने अग्नीशमनदलाला देण्यात आली. बघता-बघता शेजारीच असलेल्या दोन गोदामाना देखील आग लागली. अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, बारदाना पेट घेत असल्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण आणता आले नाही. सकाळी नऊ वाजतापर्यंत आग विझविण्याचा संघर्ष सुरू होता. अखेर अग्नीश‘न दलाच्या पथकाला यश आले.