नागरी सेवा दिवस साजरा वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
17

सेवा हमी व माहितीचा अधिकाराची माहिती
गोंदिया,दि.२१ : नागरी सेवा दिवस आज (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा.रुद्रकार यांनी सेवा हमी कायदयाची माहिती दिली. हया कायदयामुळे जनतेला विहित काळात सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्याला दंड आकरण्याचा अधिकार या कायदयात आहे. या कायदयामुळे विहित कालावधीत कार्यक्षमपणे, पारदर्शकतेने सेवा मिळण्यास मदत झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात या कायदयाचे महत्व पटवून देतांनाची चित्रफित दाखविण्यात आली.
सहायक अधीक्षक श्री.किरीमकर यांनी माहितीचा अधिकार या कायदयावर आपल्या मार्गदर्शनातून प्रकाश टाकला. या अधिकारातील तरतूदींची माहिती दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनीही आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले.
नागरी सेवा दिवसाचे औचित्य साधून वन विभागात उत्कृष्ट सेवा देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.कदम, टी.व्ही.चन्ने, वनपाल ए.एल.सावळे, आर.एम.वैद्य, एस.एस.रहांगडाले, आर.एस.नागपूरे व गणेश मेश्राम यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.