भांडेकरांचे सप्त खंजरीवर प्रबोधन

0
13

तिरोडा : रामनवमी व हनुमान जयंतीच्या निमीत्त सप्त खंजरी वादक दीपक भांडेकर यांचे समाज प्रबोधन किर्तन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला गावकर्‍यांचा उत्सूर्फ प्रतिसाद मिळाला. भांडेकरानी प्रबोधनातून सांगीतले की महापुरूषांच्या जयंत्या त्यांचे विचार आत्मसात करण्याकरिता त्यांच्या सांगीतलेल्या मार्गावर चालण्याकरीता साजरी केली जात असते. करटी बु. येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती हा सप्ताह मोठय़ा उत्साहात मागील ३0 वर्षापासून साजरा केला जातो. श्रीराम नवमी शोभायात्रा, संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी महाप्रसाद वितरण करण्यात आले. यामध्ये युवकांचा मोठा सहभाग होता. संकट मोचन हनुमान मंदिर करटी बु. येथे महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.