किकरीपार येथे किसान ग्रामसभा

0
10

आमगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंत भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमगाव तालुक्याच्या किकरीपार येथे किसान ग्राम सभा घेण्यात आली.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सिंधु भुते, अतिथी म्हणून जि.प. गोंदियाच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी आर. डी. बागडे, खंड विकास अधिकारी एम.डी. धस, तालुका कृषी अधिकारी पी.एन.धरमशहारे, विस्तार अधिकारी डी.एम. खोटेले, सरपंच कविता मेंढे, उपसरपंच डुडेश्‍वर भुते, सदस्य मेघश्याम मोटघरे, प्रल्हाद बिसेन, सविता हेमने, शोभा महारवाडे, दर्शना मेश्राम, केशर सोनवाने, गिता बिसेन, ईश्‍वर बिसेन, एस.टी. बिसेन, ग्रामसेविका कमल बारसे, सुनिल दोनोडे, बाबू मेंढे, नरेंद्र बागडे, सुरेश चुटे उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी धरमशहारे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सोबतच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती दिली.
या अभियानात पंचायतराज संस्थाचे बळकटीकरण, शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावणे, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जीवनमान उंचावणे तसेच सामाजिक सलोखा नेहमीसाठी अबाधित राखणे, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, ग्रामविकास सभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामविकास सभेत कृषी विषयक माहिती दिली.तसेच सर्व शेतकर्‍यांना पीक विमा व इतर कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. आभार ग्रामसेवक एस.टी. बिसेन यांनी मानले.