आमगाव व सालेकसा डॉ.आंबेडकरांना अभिवादन

0
12

गोंदिया,दि.५ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना आमगाव व सालेकसा येथे अभिवादन करण्यात आले. आमगाव येथील भवभूती महाविद्यालयात व्याख्यानमाला व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. ए.जी.देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री.अग्रवाल, गृहपाल जे.एम.कर्णाळे, तर वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, प्रा.मिलींद रंगारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सामाजिक न्याय, बंधुता, जाती निर्मुलन व व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले. संचालन बुध्दघोष शिंगाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार एच.एस.घाटघुमर यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे कार्मचारी व भवभूती महाविद्यालयाचे प्रा. एम.जी.आवळे सह अन्य कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले.
सालेकसा येथील एम.बी.पटेल महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार श्री.बारसे, ग्रा.पं.सरपंच योगेश राऊत, प्राचार्य डॉ.जैन उपस्थित होते. प्रा.मिलींद रंगारी व श्री.वालदे यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.