औरंगाबादच्‍या पोलिस शिपायाने सर केला एव्हरेस्ट

0
5

औरंगाबाद – येथील ग्रामीण पोलिस दलातील जिद्दी शिपाई शेख रफिक याने गुरुवारी सकाळी 10 एव्‍हरेस्‍ट शिखर सर केले.रफिक हा एव्‍हरेटचा सागरमाथा सर करणारा महाराष्ट्र पोलिस दलातला पहिलाच जवान ठरला आहे. यासाठी तो तीन वर्षांपासून सतत प्रयत्‍न करत होता. दरम्‍यान, दोनदा एव्‍हरेस्‍टच्‍या पायथ्‍याशी जाऊन मृत्‍यूच्‍या दाढेतून परत आला होता. यावेळी 4 एप्रिल रोजी तो एव्हरेस्ट मोहिमेवर निघाला होता.