दीदी-जया यांनी सत्ता राखली, काँग्रेसने पराभव स्विकारला

0
6

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यातील महिला नेत्यांनी सत्ता कायम ठेवली आहे. तर, आसाममध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेचा सोपान चढत आहे. केरळमध्ये भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. तर, पद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसला यश मिळाले असले तरी या पाच राज्यातील निवडणुकीत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा पराभव स्विकारला आहे. दुसरीकडे, नरेंद्र मोदींनी फोन करुन ममता आणि जयललिता यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यात भाजपने केलेल्या चांगल्या प्रदर्शनाबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
– त्यांनी ट्विट केले आहे, – देशभरात लोकांचा भाजपवर विश्वास वाढत आहे. लोक या पक्षाकडे सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने मोठ्या आशेने पाहात आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, पाच राज्यांमध्ये विजयी झालेल्या पक्षांना शुभेच्छा.जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्विकारतो.

बंगालच्या विजयानंतर ममता म्हणाल्या, ‘आम्ही प्रादेशिक पक्ष असूनही दिल्लीपासून कोलकातापर्यंत आमच्याविरोधात षडयंत्र होत राहिले. मात्र जसे अर्जुनाने आपले लक्ष्य निश्चित केले होते, तसेच माझे ध्येय ठरलेले होते.’
निवडणुकीच्या काळात सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. सेंट्रल पोलिसच्या नावाने त्रास दिला गेला.