पोगेंझरा हनुमान मंदिर जिर्णोद्धार भूमिपूजन शनिवारी

0
10

गोरेगाव : आमदार विजय रहांगडाले यांच्या विकास निधीतून पोंगेझरा -बोळूंदा येथील शिव मंदिरा समोरील सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, श्‍वासतानंद महाराज, उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड, गुपतेश्‍वर महाराज, एशेश्‍वरानंद महाराज, पंडीत रामेश्‍वर शर्मा, पं.ललीत पुरोहित, पं.शिवकुमार चौबे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, ठाणेदार रविंद्र शिंदे, खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सुरेंद्र बिसेन, रोशन जायस्वाल, पं.महेश सोनी, पं.कचरुलाल शर्मा, पं.सुशील शर्मा, पं.हरि शर्मा आदी उपस्थित राहणार आहेत.
मागील वर्षी वादळाने मंदिरावर आब्यांच्या झाडाची मोठी फांदी पडल्याने मंदिर क्षतीग्रस्त झाले होते. मुर्ती बिना मंदिराची उभी असल्याने त्या मंदिराचे जिर्णोद्धार करण्याचे समस्त भाविक व ट्रस्टने ठरविले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जागेश्‍वर सूर्यवंशी यांनी केले आहे.