बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षपदी अतुल गजभिये

0
10

तिरोडा : स्थानिक महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षपदी अतुल गजभिये यांची निवड करण्यात आली. सोमवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजता महाप्रज्ञा बुद्ध विहारात कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात आली.
समितीच्या उपाध्यक्षपदी प्रकाश गेडाम, सचिवपदी के.के. वैद्य, सहसचिवपदी वंदना चव्हाण, कोषाध्यक्षपदी रत्नाकर नंदागवळी, सल्लागारपदी प्रा.के.एफ. मेश्राम, आत्माराम मेश्राम यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एस. गजभिये यांनी काम सांभाळले. माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. दिलीप बन्सोड, सेवानवृत्त प्राचार्य व्ही.डी. मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष बी.व्२ही. गोंडाणे, विहार समितीचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गेडाम, उपाध्यक्ष महेंद्र बडगे, नगरसेवक विजय बन्सोड, नगरसेवक प्रशांत डहाटे, अजय मेश्राम, अरविंद उके, मनोज गेडाम, जितेंद्र डहाटे, प्रविण शेंडे, उमेश मेश्राम, आशीष गजभिये, पंचशीला रामटेके, टी.एम. वैद्य आदी उपस्थित होते.