पेंच प्रकल्पात ४६ वाघ!

0
15

नागपूर – पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोर, उमरेड कऱ्हांडला व टिपेश्‍वर अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव प्रेमींनी केलेल्या पाणवठ्यांवरील प्रगणनेत ४६ वाघांची नोंद करण्यात आली. त्यात पेंचमध्ये सर्वाधिक २५ वाघांसह १२ बिबट दिसले. पेंच व्याघ्रप्रकल्पातील सर्वच अभयारण्यात ३५० मचाणीवर ७०० वन्यप्रेमी प्रगणनेत सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी अकराला प्रगणना सुरू होऊन रविवारी सकाळी संपली. त्यामध्ये पेंच व्याघ्रप्रकल्पात २५ वाघांसह १२ बिबट व १३ अस्वलांचे दर्शन वन्यजीवप्रेमींना झाले. बोर व्याघ्रप्रकल्पात चार वाघ, दोन बिबट व १३ अस्वल, उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात १३ वाघ, ४ बिबट तर टिपेश्‍वर अभयारण्यात चार वाघ, दोन बिबट आणि सात अस्वलांची नोंद वन्यजीव प्रेमींनी केली.