तिसऱ्या ट्रॅकच्या कामाचा परिणाम – रायपूर मार्गावरील गाड्या प्रभावित

0
12

नागपूर – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळाअंतर्गत सिलायारी ते उरकुरादरम्यान तिसऱ्या ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामांमुळे रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या निर्धारित स्थानकांवर पोहोचणार नाहीत. ४ जूनपर्यंत या मार्गावरील गाड्यांचे  वेळापत्रक विस्कळीत राहणार आहे.

या मार्गावर सद्यस्थितीत ‘प्री-नॉन इन्टर लॉकिंग’चे कार्य सुरू आहे. यामुळे १२८५५ बिलासपूर – नागपूर इंटरसिटी २८ मे रोजी धावणार नाही. १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी २८ मे ते ३० मेदरम्यान रद्द करण्यात आली आहे. ५८११७ आणि ५८११८ ही गोंदिया ते झारसुगढदरम्यान धावणारी पॅसेंजर २३ मे ते ३ जूनदरम्यान रायपूर ते बिलासपूर या स्थानकादरम्यान धावणार नाही. 

१५२३१ आणि १५२३२ ही बरौनी ते गोंदिया दरम्यान धावणारी रेल्वे उस्लापूर ते गोंदिया स्थानकादरम्यान धावणार नाही. ५८१११ आणि ५८११२ ही टाटानगर ते इतवारीदरम्यान धावणाऱ्या रेल्वेची सेवा ४ जूनपर्यंत इतवारी ते बिलासपूरदरम्यान बंद राहील. ६८७०६ डोंगरगड ते बिलासपूर मेमू २३ मे ते ३ जूनदरम्यान रायपूर ते बिलासपूर स्थानकादरम्यान धावणार नाही. तसेच १२७६८ संतरागछी-नांदेड एक्‍स्प्रेस २६ मे रोजी ४५ मिनिटे आणि २२५१२ कामाख्या-कुर्ला एक्‍स्प्रेस ३० मे रोजी पावणेदोन तास बिलासपूर  येथे थांबेल. 

उशिरा धावणाऱ्या गाड्या
याशिवाय १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेस २५ आणि ३० मे रोजी २ तास १५ मिनिटे आणि २६ मे रोजी सव्वातास उशिरा धावेल. १८२४० नागपूर-बिलासपूर एक्‍स्प्रेस २७ मे रोजी नागपूर स्थानकावरून ५ तास उशिरा धावेल.