सीईओ पुलकंडवारांची लक्ष्मी गौशाळेला भेट

0
8

गोंदिया- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी डाॅं.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारला चुटीया येथील लक्ष्मी गौशाळेला भेट देऊन पाहणी करुन सदिच्छा भेट दिली.ते ग्रामपंचायत कार्यालयात सुरु असलेल्या पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन विभागाच्यावतीने सुरु असलेल्या  ओ़डीईटी प्रशिक्षण कार्यशाळेची पाहणी करण्याकरिता गेले असता तसेच आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी गेले असता त्यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत जि.प.सद्स्य सीमा मडावी,गोंदिया प.स.सभापती स्नेहा गौतम,उपमुख्यकार्याकारी अधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.यावेळी लक्ष्मी गौशाळेचे संचालक माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे,ऋषी टेंभरे,मुन्नालाल तुरकर,उपसरंपच रामु शरणागत ,महेश परसगाये आदी उपस्थित होते.टेंभरे यांच्या कार्याचा मुकाअ यांनी गौरव केला कारण मुकाअ पुलकुंडवार हे स्वत पशुवैद्यकिय अभ्यासक्रमाची पदवीधारक असल्याने त्यांना या गौशाळेची माहिती मिळताच त्यांना भेट देण्याची ईच्छा झाली.त्यांनी भेट देऊन गीर या संकरीत गायीची माहिती जाणुन घेतली.