विज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळासमोर निषेध सभा

0
10

गोंदिया -महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळ कार्यालयासमोर गुरुवारला सायकांळी सयुंक्त कृती समितीच्यावतीने निषेधद्वार सभा घेण्यात आली.या सभेला सब आॅर्डिनेट इंजिनिर्यस असो.सहसचिव इंजि.हरिष डायरे,प्रविभागीय सचिव सुहास धामणकर,वर्कस फेडरेशनचे विवेक काकडे,विजय चौधरी,भारतीय मजुर संघटनेचे योगेश्वर सोनुले,तांजत्रिक संघटनेचे राजु गोंदरे यांनी मार्गदर्शन केले.द्वारसभेचे संचालन कुमार कोकणे यांनी केले.विज वितरण कंपनीच्यावतीने कर्मचारी विरोधी घेण्यात येत असलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ही सभा घेण्यात आली.तसेच येत्या 7 जूनपासून राज्यस्तरावर कंपनीच्या विरोधात सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलनावर जाणार असल्याचेही कळविण्यात आले.