१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत नागझिरा पर्यटकांसाठी बंद

0
10

३० जूनपर्यंत ऑफलाईन बुकींग व पर्यटकांना प्रवेश
गोंदिया दि.१५ :- वन्यजीवांनी व वनराईने समृध्द असलेले पर्यटकांचे आवडते ठिकाण नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र हे पावसाळा सुरु होणार असल्यामुळे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीसाठी बंद राहणार आहे. परंतू १६ ते ३० जून या कालावधीत केवळ ऑफलाईन बुकींग तसेच प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर स्पॉट बुकींग पध्दतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. १६ ते ३० जून या काळात ऑनलाईन बुकींग पुर्णपणे बंद राहिल. मात्र या काळात पाऊस आल्यास व अंतर्गत रस्ते पर्यटकांना फिरण्यास अयोग्य ठरल्यास लघुसुचनेद्वारे पर्यटक प्रवेशद्वारे तात्काळ बंद करण्यात येतील त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत अंतर्गत व्यवस्थापनासाठी ऑनलाईन व ऑफलाईन बुकींग पूर्णपणे बंद राहील. याची पर्यटकांनी नोंद घ्यावी. पर्यटकांनी अधिक माहितीसाठी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय कार्यालयाच्या ९९२३६०२९१८ या भ्रमणध्वनीवर तसेच ०७१८२-२५१२३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्री गोवेकर यांनी केले आहे.