१६ जून रोजी पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

0
25

गोंदिया,दि.१५ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १६ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी १०.३० वाजता नागपूर येथून मोटारीने सडक/अर्जुनीकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता सडक/अर्जुनी येथे आगमन. सडक/अर्जुनी येथील नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित समाधान शिबिराचे उदघाटन करतील. दुपारी १ वाजता सडक/अर्जुनी येथून मोटारीने अर्जुनी/मोरगावकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता अर्जुनी/मोरगाव येथे आगमन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित समाधान शिबिराचे उदघाटन करतील. सायंकाळी ४ वाजता अर्जुनी/मोरगाव येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण करतील.