येरंडीतील विहिरीत पडले अस्वल!

0
7

कुरखेडा,दि.१०: जंगलात भटकताना एक अस्वल विहिरीत पडल्याची घटना आज रविवारला(दि.10) सकाळी येरंडी येथे घडली. वनकर्मचाऱ्यांनी या अस्वलाला सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले.
येरंडी येथे जंगलाशेजारी असलेल्या एका शेतातील विहिरीत एक अस्वल पडले होते. ही बाब काही महिलांच्या लक्षात येताच त्यांनी वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी नंतर कुरखेडा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कळविले. पुढे वडसा येथील उपवनसंरक्षक श्री.कोडाप, वनपरिक्षेत्राधिकारी कोरेवार, क्षेत्रसहायक मेनेवार, ठाकरे, मेटे, वनरक्षक राऊत, तसेच कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक श्री.सुपे, पुराड्याचे पोलिस निरीक्षक श्री.पाल हेही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीत जाळी टाकून अस्वलाला बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर अस्वलाला जंगलात सोडणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या बचाव मोहिमेत वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये व गावकऱ्यांनीही सहकार्य केले.