पक्षिप्रेमी पोलीसाकडून घुबडाला जिवदान

0
11

सुरेंद्र ठवरे
अर्जुनी मोर,दि.16–स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिवाकर शहारे यांनी अस्ताव्यस्त असलेल्या घुबडाला पकडुन वनविभागाच्या स्वाधीन केले.त्यानंतर वनकर्मचारी यांनी घुबडावर उपचार करुन जंगलात सोडले.पोलीस हवालदार दिवाकर शाहारे हे वडसा-कोहमारा मार्गानी अर्जुनी मोर कडे येत असतांना गौरनगर – आसोली रस्त्याच्याकडेला एक घुबळ पक्षी अस्ताव्यस्त स्थितीत पडून असल्याचे दिसताच त्यांच्यातील पक्षीप्रेम जागृत झाले आणि त्या घुबडाला पकडून आणून अर्जुनी मोर येथील वनविभागाच्या कार्यालया आयएफएस राहुल पाटील यांनी सोपविले.त्यांनी लगेचच घुबडाची आरोग्य तपासणी करण्यासाठी पशुचिकित्सालय गाठून औपधोपचार करुन जंगलात सोडले. सदर घूबळ पक्षी हा युरॉशियन इगल ऑडल श्रृंगी घुबळ असल्याचे क्षेत्रसहाय्यक सचिन ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी पक्षीप्रेमी पोलीस हवालदार दिवाकर शाहारे, आयएफएस राहुल पाटील, मोरगांवचे उपसरपंच राजु पालीवाल, बाजार समितीचे संचालक व्यंकट खोब्रागडे, क्षेत्रसहायक सचिन ठाकरे, वनरक्षक दिपक बरडे ,राजु पशीने प्रामुख्याने उपस्थित होते