विदर्भ राज्य समितीची रविवारी गोंदियात बैठक

0
9

गोंदिया,दि.22-विदर्भ राज्य होणे ही काळाची गरज आहे.वेगळ्या विदर्भाशिवाय आपले व येणार्या पीढीचेही भविष्य अंधारीच आहे.शेतकर्यांची दयनिय अवस्था,बेरोजगारी व विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे.पण आपला लढा अधिक तीव्र करण्यासाठी युवकांना सहभागी होणे आवश्यक झाल्याने विदर्भ राज्य समितीच्यावतीने गोंदिया जिल्ह्यातील युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी रविवार 24 जुर्ले रोजी पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सोबतच युवकांची कार्यशाळा होणार असून यास वामनराव चटप, रामभाऊ नेवले,डॉ.श्रीनिवास खांदेवाले,ॲड.नंदाताई पराते,अरुण केदार,डॉ.दीपक मुंढे आदी मार्गदर्शन करणार आहेत.युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. टी. बी. कटरे, जिल्हा अध्यक्ष ,अॅड. अर्चना बी. नंदघले जिल्हा महिला अध्यक्ष ,भुमेश बी. रहांगडाले युवा अध्यक्ष यांनी केले आहे.