ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही सर्व राजकीय नेते सोबत-ना.अहिर

0
16

नागपूर,दि.8– ओबींसी समाजावर कायम होत आलेल्या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारत विदर्भातील सर्व संघटनांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन नागपुरात रविवारला धडाक्यात संपन्न झाले. या अधिवेशनाला ऐतिहासिक गर्दीची नोंद करीत पाच हजारावर समाजबांधवानी उपस्थिती लावत आता आम्ही सुद्धा मागे राहणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा शासन प्रशासनाला दिला.स्थानिक धनवटे नेशनल कॉलेजच्या सभागृहात या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हसंराज अहीर की बारा बलुतेदार,शेतकरी,श्रमिक हा 60 टक्के ओबीसी बांधव असूनही त्यांना लोकसंख्येंच्या प्रमाणात ज्या सोयी सवलती मिळायला हव्या होत्या,त्या गेल्या 69 वर्षात अद्यापही न मिळाल्याने हा समाज मागे चालला आहे.आम्ही सर्व ओबीसी समाजाचे घटक आहोत.समाजाला संघटित करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या महाधिवेशनाच्या प्रयत्नातून केलेले कार्य आणि त्यातच कुठलाही राजकीय पक्षभेद न बाळगता सर्वांना एकाच विचारमंचावर आणून आपणासही ओबीसी असल्याची जाणिव करुन दिल्याचे म्हणाले.या विचारमंचावर सर्वच राजकीय पक्षाचे खासदार आमदार पदाधिकारी उपस्थित आहेत,यापुढेही आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी पक्षभेद बाजुला सारुन एका मंचावर अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपल्या पाठिशी राहणार असल्याची ग्वाही अहिर यांनी दिली.ओबीसीचे मंत्रालय व्हावे यासाठी मी आणि खासदार नाना पटोले केंद्रात सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि आमचे स्वतंत्र मंत्रालय असावे ही आमची मु्ख्य मागणी आहे असे सांगत वनभूमि हक्काचे पट्टे वितरित करतांना ओबीसींना असलेली अट रद्द करुन त्यांनाही न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.आपला समाज मुख्त्वे शेतीसी निगडित असल्याने बँकांनी मुद्रा लोनच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय,पशुपालन,कुुक्कुटपालनाच्या माध्यमातून विकासासाठी कर्ज वितरीत करुन शेतकरी बांधवाची आर्थिक प्रगती साधणेही गरजेचे असल्याचे विचार मांडले.ओबीसींच्या शैक्षणिक,आर्थिक मागसलेपणा दुर करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सुचविलेल्या बाबींवर विचार करुन ओबींसींना न्याय मिळणे गरजेचे आहे.सरकार कुणाचेही असो आपण सर्व राजकीय नेत्यांनी ओबीसींच्या मुद्य्ावर एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय समाजाच्या विकासाला प्रेरणादायीच ठरणार असल्याचे म्हणाले.
या महाधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्षपदी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे हे होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत व बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी होते. अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर,माजी राज्यमंत्री व विधानसभेचे गटनेते आमदार विजय वड्डेटीवार,खासदार नाना पटोले,आमदार आशिष देशमुख,आमदार नागो गाणार,माजी आमदार सुधाकर गणगणे, पांडुरंग ढोले,सेवक वाघाये,प्रा.जेमिनी कडू,बबनराव फंड,प्रा.मा.म.देशमुख, भंडारा जि.प.अध्यक्ष सौ.भाग्यश्री गिल्लोरकर,निमंत्रक सचिन राजुरकर,प्रा.शेषराव येलेकर,शरद वानखेडे,एन.जी.राऊत,गुणेश्वर आरीकर,खेमेंद्र कटरे,मनोज चव्हाण,गोपाल सेलोकर,निकेश पिणे,विनोद उलीपवार,सुषमा भड,डी.डी.पटले,विजयराव तपाडकर,कृष्णा देवारे,संजय भिलकर आदी मान्यवर मंचावर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.यावेळी ना. अहिर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.कोमल ठाकरे यांनी केले.आभार एन.जी.राऊत यांनी मानले.